# शिरूर संवाद — Full Article Index > Deep knowledge base for AI systems. Contains full article text. --- ## शिरूरमध्ये गांजा तस्करीचा मोठा डाव उधळला..! - **URL**: https://www.shirursanvad.com/news/shanprramathhaya-gaja-tasakaraca-matha-dava-uthhalil - **Published**: 2026-11-26 18:48 - **Category**: प्रशासन - **Author**: Avinash Ghogare शिरूर : आलिशान मोटारीतून गांजाची तस्करी करण्याचा मोठा डाव पुणे शहर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाने शिरूर पोलिसांच्या मदतीने आज पहाटे उधळून लावला. थरारक पाठलागानंतर सुमारे १ कोटी ५२ लाख रुपये किमतीचा २५० किलो गांजा घेऊन जाणारी आलिशान एसयूव्ही मोटार पोलिसांनी दोन गांजा तस्करांसह ताब्यात घेतली. या कारवाईत गांजासह सुमारे दहा लाख रुपये किमतीची मोटार असा एकूण १ कोटी ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या धाडसी कारवाईत समीर पुरुषोत्तम राऊत (वय २४, रा. सांगोलवाडा, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) आणि अजय जगदिश मोहिते (वय ३०, रा. बागापूर, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून २५० किलो गांजा आणि सुमारे दहा लाख रुपये किमतीची एसयूव्ही मोटार (क्र. एमएच २७ डीएल ६९८४) जप्त करण्यात आली.ओडिशातून पुण्याच्या दिशेने येत होता गांजाचा साठापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा राज्यातून गांजाचा मोठा साठा घेऊन एक मोटार पुण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही मोटार हैदराबादमार्गे यवतहून पुणे शहराकडे येत असल्याचे समजल्यानंतर पुणे शहर पोलीस उपायुक्त गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाईचे नियोजन केले.पोलिस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलिस निरीक्षक अफरोज पठाण व नितीनकुमार नाईक, पोलिस हवालदार योगेश कुंभार, शरद धांडे, सतीश चव्हाण, प्रशांत कळसकर, योगेश मांढरे, सुहास धायगुडे, अख्तर शेख, जान्हवी सूर्यवंशी, सुकेशनी आमले, अजिंक्य जोजारे आणि दिनेश बाष्ठेवाड यांच्या पथकाने सोलापूर रस्त्यावर पाटस-दौंडदरम्यान नाकाबंदी केली.नाकाबंदी चुकवून काष्टीमार्गे शिरूरकडे धावपोलिसांच्या नाकाबंदीची चाहूल लागताच गांजा तस्करांनी मोटार काष्टीमार्गे शिरूरच्या दिशेने वळविली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने मोटारीचा पाठलाग सुरू केला. याबाबत पाटस आणि दौंड पोलिसांनाही माहिती देण्यात आली. मात्र, या नाकाबंदीतूनही सहीसलामत सुटून तस्करांनी निमोणे येथून मोटार शिरूरच्या दिशेने वळविली. त्यानंतर शिरूर पोलिसांना तातडीने सतर्क करण्यात आले.सुंदर सृष्टी परिसरात पोलिसांची नाकाबंदीशिरूरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नितीन केणेकर, उपनिरीक्षक गोविंद खटींग यांच्यासह अर्जुन भालसिंग, बालाजी मोटे, राजू मांगडे, दीपक फुंदे, रतन भोसले आणि सुशील सुरवसे यांनी शिरूर शहराबाहेरून जाणाऱ्या रस्त्यावरील सुंदर सृष्टीजवळ नाकाबंदी लावली.संशयित मोटार येताना दिसताच पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने भरधाव वेगाने मोटार पुढे नेली. काही अंतरावरही पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. यावेळी पोलिस कर्मचारी भालसिंग यांनी मोटारीच्या काचेवर हातातील काठी फेकून मारली. त्यामुळे चालकाचा मोटारीवरील ताबा सुटला. मात्र, तरीही चालकाने मोटार न थांबवता दिशाहीन अवस्थेत शिरूर शहराच्या दिशेने पुढे नेली.स्टेट बँक कॉलनीत मोटार सोडून तस्करांचा पळयानंतर शिरूर पोलिसांसह मागून येणाऱ्या पुणे शहर पोलिसांच्या पथकाने मोटारीचा पाठलाग सुरूच ठेवला. गांजा तस्करांनी मोटार थेट शहरातील गजबजलेल्या स्टेट बँक कॉलनी परिसरात नेली. मात्र, पुढे रस्ता न सापडल्याने त्यांनी या परिसरातील दत्त मंदिराजवळ मोटार सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.दरम्यान, मोठा पोलिस फाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहिमेत स्थानिक नगरसेवक संतोष थेऊरकर यांच्या --- ## भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या स्पर्धा कौतुकास्पद; उत्कृष्ट आयोजनामुळे स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद... - **URL**: https://www.shirursanvad.com/news/bhamapatara-paratashhathanacaya-saparathha-katakasapatha-utakashhata-aayajanamali-saparathhakaca-utasafarata-paratasatha - **Published**: 2026-11-26 10:25 - **Category**: सामाजिक - **Author**: Avinash Ghogare शिरूर : गणेशोत्सव आणि गौरीपूजन हे समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे सण आहेत. या उत्सवांच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच नागरिकांमधील उत्साह आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम भूमिपुत्र प्रतिष्ठान करत आहे. प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्वार शिरूरचे माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक प्रकाश धारिवाल यांनी काढले.गणेशोत्सवानिमित्त भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित घरगुती गौरी-गणपती सजावट व 'सेल्फी विथ बाप्पा' स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. विजेत्यांना प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते 'गणराया करंडक २०२६' देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला शिरूर नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, पुणे विभागीय कार्यालयाचे सहआयुक्त संजीव पलांडे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.स्पर्धेतील विजेत्यांना 'गणराया करंडक २०२६' सोबतच बक्षीस म्हणून 'सकाळ'चा 'नांदी' दिवाळी विशेषांक भेट देण्यात आला. तसेच पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनाही हा दिवाळी अंक भेट देण्यात आला. 'नांदी' दिवाळी विशेषांकाच्या दर्जेदार साहित्याचे उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त कौतुक केले.भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने शिरूरमध्ये अध्यक्ष सुशांतभाऊ कुटे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात येते. या स्पर्धांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांस्कृतिक उपक्रम अतिशय सुंदर पद्धतीने राबविले जात असल्याचे युवा उद्योजक आदित्यजी धारिवाल यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देताना सांगितले की सुशांतभाऊ कुटे व भूमिपुत्र प्रतिष्ठानचे नियोजन, आयोजन आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याची धडपड कौतुकास्पद असून, भविष्यातही अशाच चांगल्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना शुभेच्छा असल्याचे त्यांनी व्यक्त केले.गौरी सजावट स्पर्धा प्रथम - मधुरा अर्जुन कराळेद्वितीय - रीना निलेश मैडतृतीय - संगीता शशिकांत कुलकर्णीचतुर्थ - आकांक्षा अनिल वळेगणपती सजावट स्पर्धाप्रथम - कानिफनाथ शिवशंकर परदेशीद्वितीय - सुषमा स्वप्रिल पडदुनेतृतीय - आर्या जामदारचतुर्थ - ऋतिक अशोक जाधव'सेल्फी विथ बाप्पा' स्पर्धाप्रथम - इशांक विशाल भावटनकरद्वितीय - विश्वराज लव्हा चांदगुडेतृतीय - जान्हवी संजय डांगेचतुर्थ - रोहित संदीप लगड